
मुंबई : खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन ऑफ पालघर जिल्हा आयोजित जिल्हा स्तरीय खुल्या ॲथलेटिक्स स्पर्धा मुंबई युनिव्हर्सिटी ग्राऊंड, मरीन लाईन्स, मुंबई येथे संपन्न झाली. या स्पर्धेत पालघर जिल्ह्याचे जनार्दन महादेव टेमकर आणि त्यांची पत्नी प्रीती जनार्दन टेमकर यांनी अप्रतिम कामगिरी करीत पदकांचा गगनचुंबी षटकार ठोकला.
जनार्दन महादेव टेमकर यांनी ३००० मीटर धावणे स्पर्धेत रौप्य, १५०० मीटर चालणे स्पर्धेत रौप्य आणि लांब उडी स्पर्धेत सुवर्णपदक अशी तीन पदके पटकावली. तसेच प्रीती जनार्दन टेमकर यांनी भाला फेक स्पर्धेेत रौप्य, थाळी फेक स्पर्धेत रौप्य आणि गोळा फेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
या दोघांनी मिळून एकूण ६ पदके पटकावली असून त्यात २ सुवर्ण आणि ४ रौप्य पदकांचा समावेश आहे. दांपत्याच्या या चमकदार यशामुळे पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाची लहर उसळली आहे. जनार्दन व प्रीती टेमकर दांपत्याने गगनचुंबी षटकार मारत मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत कौशल्याचा ठसा उमटविला आहे.