
नंदुरबार ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व जिल्हा खो-खो असोसिएशन नंदुरबार, डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा जळखे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात अनुदानीत आश्रम शाळा जळखे नंदूरबार या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या कामगिरीमुळे या संघाची विभाग स्तरावर निवड झाली आहे. पुढील विभागीय खो-खो स्पर्धा धुळे येथे १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव व नवापूर तालुक्यातील शाळांच्या १४, १७ व १९ वर्षे गटांतील संघांनी सहभाग नोंदविला.
विजयी झालेल्या संघास संस्थेचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले, संस्थेचे सचिव डॉ नितीन पंचभाई, शाळेचे पालक विश्वस्त धनराज कातोरे, यशपाल भाई पटेल, सर्व संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक प्रवीणकुमार सोनवणे यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना अनिल रौंदळ यांनी मार्गदर्शन केले.