एसपीपीयु आंतरमहाविद्यालयीन महिला बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

  • By admin
  • October 6, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन महिला बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांनी केले होते तर पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना यांनी तांत्रिक सहकार्य केले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत रेणुशे, आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे, डॉ आशा बंगले, डॉ अंजुश्री ऑगस्टीन, डॉ गौरी पाटील, डॉ तुषार गुजर, विशाल लोंढे, मुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच दीप्ती शिदोरे आणि गायत्री कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतून निवड झालेल्या पहिल्या ६ महिला खेळाडू नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या झोनल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे सिटी झोनचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यात आर्या दिनेश पिसे (व्हीआयटी कॉलेज), तन्वी कुलकर्णी (सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स), आशी दलाल (आय एल एस लॉ कॉलेज), के गाना समृद्धी (पीजीजीएस, एसपीपीयू), मायुरी बोंडगे (फर्ग्युसन कॉलेज), मृण्मयी बगवे (एमईएस अबासाहेब गरवारे कॉलेज) या खेळाडूंचा समावेश आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *