
मुंबई : फलटण तालुक्यातील सुजण फाऊंडेशन आदर्की बुद्रुक आयोजित महाराष्ट्र कुस्ती संमेलन २०२५ मध्ये मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद वसंतराव पाटील यांना कुस्ती क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल “राष्ट्रीय खलिफा पुरस्कार २०२५” देऊन गौरविण्यात आले.
संपतराव जाधव, अध्यक्ष महाराष्ट्र कुस्ती संमेलन २०२२, वस्ताद नझरुधीन नायकवडी, आजिनात भागवत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा श्री भैरवनाथ मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला. गेली चार दशके वसंतराव पाटील कुस्ती क्षेत्रात कार्यरत असून आज देखील भाईंदर येथे युवा कुस्तीपटू घडविण्याचे त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री गणेश आखाड्यातर्फे वसंतराव पाटील यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.