
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे दोन प्रतिभावान खेळाडू यतीराज पाटोळे व अभिषेक आंब्रे यांची प्रतिष्ठेच्या विनू मकंड अंडर-19 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
ही स्पर्धा ९ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत रांची येथे साखळी पद्धतीने पार पडणार असून महाराष्ट्राचा संघ ई गटात आहे. या गटामध्ये महाराष्ट्रासोबत उत्तर प्रदेश, दिल्ली, आसाम, राजस्थान व पंजाब या पाच बलाढ्य संघांचा समावेश आहे.

बाद फेरी, उपांत्य आणि अंतिम सामने २५ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राजकोट येथे होणार आहेत.
यतीराज पाटोळेने यापूर्वी २०२२-२३ साली अंडर-१६ महाराष्ट्र संघात खेळ केले असून २०२२-२३ व २०२३-२४ या सलग दोन हंगामात अंडर-१९ कॅम्पसाठी त्याची निवड झाली होती. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीला अखेर महाराष्ट्र संघाची मान्यता मिळाली आहे.
अभिषेक आंब्रेची यापूर्वी अंडर-१४ व अंडर-१६ महाराष्ट्र कॅम्पसाठी निवड झाली होती. यंदा प्रथमच त्याला अंडर-१९ महाराष्ट्र संघात संधी मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
या निवडीमुळे कोल्हापूर क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळणार असून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील भविष्यातील स्पर्धांसाठी या दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
महाराष्ट्राचे सामने
९ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशविरुद्ध
११ ऑक्टोबर : दिल्लीविरुद्ध
१३ ऑक्टोबर : आसामविरुद्ध
१५ ऑक्टोबर : राजस्थानविरुद्ध
१७ ऑक्टोबर : पंजाबविरुद्ध