
छत्रपती संभाजीनगर ः सीबीएसईने राजस्थान येथे आयोजित केलेल्या सीबीएसई शालेय राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्यूदो संघटनेच्या एमआयडीसी वाळूज, बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या श्रीमती परमेश्वरी देवानी ज्यूदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू प्रथमेश दीपक पवार याने ज्यूदो खेळाचे शानदार प्रदर्शन करत १४ वर्षांखालील गटात कांस्यपदक पटकावले.
अग्रसेन विद्यामंदिर शाळेत शिकत असलेल्या प्रथमेश पवार याचा क्रीडा मंडळाच्या वतीने प्रथमेश आणि आई आरती पवार, तर वडील दीपक पवार यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. प्रथमेश पवारला मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
राष्ट्रीय पदक विजेत्या प्रथमेश पवारचे राज्य संघटनेचे सचिव दत्ता आफळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई , लता लोंढे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, डॉ गणेश शेटकर, प्रसन्न पटवर्धन, दीप्ती शेवतेकर, भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, झिया अन्सारी, विजय साठे,अमित साकला, चंद्रशेखर पोळ, संजय परळीकर, सुनील सिरस्वाल, मनिंदर बिलवाल, कुणाल गायकवाड, दत्तू पवार तसेच बजाजनगर क्रीडा मंडळाचे नंदमूरी श्रीनिवास, मनोहर देवानी, अनिल पवार, नामदेव दौड, अभिजीत दळवी, भिमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर, शैलेश कावळे, मिनीनाथ खलाटे, सागर घुगे, राज जंगमे, हर्षल महाजन ,कल्याणी शेटकर, उषा अंभोरे, ऋतुजा सौदागर, सायली राऊत, सुप्रिया जंगमे, ऋतुजा पाटील, प्रियंका गुप्ता, तृप्ती जंगमे, धनश्री वाळूंज, यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.