
नांदेड ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि नांदेड जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन व वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तर आर्चरी स्पर्धा वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूल येथे उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्टन वेलिंग्टन स्कूलचे ज्येष्ठ सल्लागार निळकंठराव पावडे, अध्यक्ष विनोद पावडे, सिंधुताई पावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य चलपती राव, प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा अधिकारी चंद्रप्रकाश होन वडजकर, मुख्याध्यापक सतीश शिरसाट, प्रसाद महाजन, जिल्हा संघटना सचिव वृषाली पाटील जोगदंड, मनोहर सूर्यवंशी, बाबू गंदपवाद, बालाजी चेरले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंतरराष्ट्रीय खेळाडू ज्ञानेश चेरलेचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. शाळेच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू, पालक, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांची भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय जाधव, तेजल मिस, शुद्धमती कदम मिस, रागिनी फूले, अर्चना कांबळे यांनी केले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक संतोष चुनाडे, रविकांत चव्हाण, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.