
मुंबई ः दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने १२, १४ आणि १६ वर्षांखालील मुलांसाठी ओव्हल मैदान, चर्चगेट येथील अकादमीच्या मैदानावर १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
या चाचणीत भाग घेण्यास उत्सुक असलेल्या मुलांनी वरील वेळेत पूर्ण क्रिकेट गणवेशात ओव्हल येथील अकादमीच्या मैदानात वयाचा दाखला आणि आधार कार्ड यासह उपस्थित राहावे.
१६ वर्षाखालील गटासाठी ०१/०९/२००९ ते ३०/०८/२०११ या कालावधीतील जन्म असलेली मुले निवड चाचणीसाठी पात्र ठरतील. १४ वर्षाखालील गटासाठी – ०१/०९/२०११ ते ३०/०८/२०१३ या कालावधीतील जन्म असलेली मुले निवड चाचणीसाठी पात्र ठरतील. १२ वर्षाखालील गटासाठी ०१/०९/२०१३ ते ३०/०८/२०१५ या कालावधीतील जन्म असलेली मुले निवड चाचणीसाठी पात्र ठरतील.