राज्य बॅडमिंटन स्पर्धेत पीईएस कॉलेजचे विद्यार्थी चमकले

  • By admin
  • October 7, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

तुपार शर्मा, निमग कुलकर्णी यांची लक्षवेधक कामगिरी 

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी साकारत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीत तुपार शर्मा, निमग कुलकर्णी, नागेश चामले आणि श्रावण दुचके यांनी प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर २०–६ असा गुणफरक राखला. त्यानंतर तुपार शर्मा आणि निमग कुलकर्णी यांनी डबल्स प्रकारात जोरदार लढत देत २०–१२ असा फरक राखत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.अंतिम सामन्यात तुपार शर्मा आणि श्रावण दुचके यांनी दमदार कामगिरी करत उपविजेतेपद मिळवले. डबल्स स्पर्धेतही निमग कुलकर्णी आणि तुपार शर्मा यांनी संयुक्तरित्या रौप्य पदकावर आपली छाप उमटवली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हटले की, “महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सातत्याने उत्कृष्ट यश संपादन करून संस्थेचा लौकिक उंचावला आहे.” तसेच सर्व शिक्षकवृंद आणि प्रशिक्षकांचेही त्यांनी कौतुक केले. या कामगिरीने पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने पुन्हा एकदा महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *