
संस्क-ती घोरतळेचे शानदार शतक, आरोही अहेरची अष्टपैलू कामगिरी, शुभ्रा चव्हाणचे सात विकेट
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १५ महिला एकदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत जालना महिला संघाने डार्क महिला संघाचा ५९ धावांनी पराभव करुन सलग दुसरा विजय साकारला. संस्कृती घोरतळे सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
भोसरी येथील गॅरी कर्स्टन मैदानावर हा सामना झाला. जालना महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३२.१ षटकात सर्वबाद २२६ अशी भक्कम धावसंख्या उभारली. डार्क महिला संघ ३५ षटकात सहा बाद १६७ धावा काढू शकला. त्यामुळे जालना संघ ५९ धावांनी विजयी झाला.

या सामन्यात संस्कृती घोरतळे हिने शानदार शतक साजरे केले. तिने ११७ धावांची दमदार खेळी करताना १७ चौकार मारले. तास्मिया मोहसिन कुलवंत हिने १२ चौकारांसह ७१ धावा फटकावल्या. आरोही अहेर हिने ६६ चेंडूत ६६ धावांची वेगवान खेळी केली. तिने ११ चौकार मारले.
गोलंदाजीत शुभ्रा चव्हाण हिने २३ धावांत सात विकेट घेऊन सामना गाजवला. आरोही अहेर हिने १९ धावांत दोन बळी घेतले. अपूर्वा रुपनर हिने १९ धावांत एक गडी बाद केला.