डी ११ टी २० लीग क्रिकेट ः सामीउद्दीन सय्यद, राजू परचाके सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत लकी क्रिकेट क्लबने व्हिजन क्रिकेट अकादमीवर सहा विकेट राखून मोठा विजय साकारला. दुसऱया सामन्यात राऊडी सुपर किंग संघाने यंग ११ संघाचा ४ गडी राखून पराभव केला. या लढतींमध्ये सामीउद्दीन सय्यद आणि राजू परचाके यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर हा सामना सुरू आहे. व्हिजन अकादमीने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकात आठ बाद १११ धावा काढल्या. लकी क्लबने ९.५ षटकात चार बाद ११२ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात चिंतन देशमुख (३३), शाहरूख (२६) व अजिंक्य गुंटे (२४) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत सामीउद्दीन सय्यद (२-३२), अभिजीत भगत (२-४४) व वहाब (१-१२) यांनी प्रभावी गोलंदाजी करुन विकेट्स घेतल्या.
यंग ११ पराभूत
दुसरा सामना यंग ११ आणि राऊडी सुपर किंग यांच्यात झाला आणि हा रंगतदार सामना राऊडी सुपर किंग संघाने चार गडी राखून जिंकला. यंग ११ संघाने १८.४ षटकात सर्वबाद १७३ धावसंख्या उभारली. राऊडी संघाने १९.१ षटकात सहा बाद १७८ धावा फटकावत आगेकूच केली.
या सामन्यात श्रेयस बनसोड (६१, १० चौकार, २ षटकार), धीरज बहुरे (३९, दोन षटकार, ३ चौकार), बाळू हिवाळे (३७, चार चौकार) यांनी शानदार फलंदाजी केली.
गोलंदाजीत राजू परचाके याने २७ धावांत चार विकेट घेऊन सामनावीर पुरस्कार मिळवला. सय्यद अब्दुल वाहीद (२-२५) व स्वप्नील चव्हाण (१-२१) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.