
गतविजेता एएससी ११ संघावर मात
शहादा : पी के अण्णा पाटील फाउंडेशन आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत पुरुषोत्तम करंडक क्रिकेट स्पर्धा (सिझन ३) अतिशय उत्साहात पार पडली. या रोमांचक स्पर्धेत तंत्रनिकेतन ११ संघाने गतविजेता एएससी ११ संघावर विजय मिळवून विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत एकूण आठ संघांतील १२८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या संकल्पनेतून आणि समन्वयक प्रा मकरंदभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
क्रीडांगणावर शिक्षकवर्ग खेळताना पाहून विद्यार्थ्यांमध्येही खेळाची प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच मोबाईलपासून दूर राहून शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती साध्य व्हावी, हा या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी केले. त्यांनी सांगितले की, “आजच्या धावपळीच्या जीवनात ज्या व्यक्तीने मैदानाशी नाळ जोपासली आहे, त्याचे आरोग्य नेहमी उत्तम राहते. हाच संदेश देण्यासाठी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.”
स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या हस्ते विजयी आणि उपविजयी संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या वेळी प्रा मकरंदभाई पाटील, प्राचार्य डॉ एम के पटेल, प्रा कल्पना पटेल, डॉ एस डी सिंधखेडकर, क्रीडा संचालक डॉ अरविंद कांबळे, पर्यवेक्षक के एच नागेश, डॉ जितेंद्र माळी, डॉ प्रकाश पटेल, डॉ बी के सोनी, डॉ एन जे पटेल, डॉ सुनील पवार, डॉ आर एस पाटील, सुनील भांडारकर, एस आर पाटील, राजेंद्र पाटील, डॉ महेश जगताप, डॉ गोपाल गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे पंच म्हणून फरान शेख, कृष्णकांत ठाकरे आणि रेहान शेख यांनी कार्यभार सांभाळला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निकाल वाचन डॉ अरविंद कांबळे यांनी केले, तर समालोचन प्रा व्ही सी डोळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ जितेंद्र माळी यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोपाल सोनार, संजय विसावे, दिलवर ठाकरे, दिनेश बागले, आशिष सोनवणे आदींचे विशेष योगदान लाभले.
तंत्रनिकेतन ११ संघाच्या विजयाने पुरुषोत्तम करंडक क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या सिझनला एक सुंदर आणि उत्साहवर्धक परिपूर्णता मिळाली. मैदानावर उमटलेली उत्स्फूर्तता, शिक्षकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती — या सर्वांनी मिळून ‘खेळ हीच खरी आरोग्य संस्कृती’ हा संदेश पुन्हा अधोरेखित केला.
स्पर्धेचा निकाल
विजेता: तंत्रनिकेतन ११
उपविजेता: ए.एस.सी. ११
गुणवंत खेळाडू
मॅन ऑफ द सिरीज : विपीन पाटील
बेस्ट बॅट्समन : विपीन पाटील
बेस्ट बॉलर : मनीष पाटील
बेस्ट कॅचर : मनीष चौधरी
बेस्ट कीपर : अनिल बेलदार
बेस्ट फिल्डर : डॉ. महेश जगताप