
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा प्रतिभावान अष्टपैलू क्रिकेटपटू समर्थ वासुदेव दोरनाल याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली आहे.
समर्थ हा डावखुरा फलंदाज आणि डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज असून, तो आपल्या किफायतशीर गोलंदाजी व सातत्यपूर्ण फलंदाजीसाठी ओळखला जातो. टॉप-ऑर्डरमध्ये प्रभावी कामगिरी करताना त्याने अनेक सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे.
या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंग मोहिते पाटील, माजी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, सचिव चंद्रकांत रेम्बोरसे, खजिनदार संतोष बडवे, वरिष्ठ व कनिष्ठ (रणजी ट्रॉफी) निवडकर्ता रोहित जाधव, तसेच निवड समिती सदस्य किशोर बोरामणी, शिवा अकलूजकर, सुनील मालप, अनिल जाधव, उदय डोके, आप्पू साहेब गोठे, टी पवार, नितीन देशमुख यांनी समर्थचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.