महाराष्ट्र अंडर १९ संघात सुवासिक जगतापची निवड

  • By admin
  • October 8, 2025
  • 0
  • 63 Views
Spread the love

सोलापूर ः शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शंकरनगर-अकलूज ( शिवरत्न पॅटर्न,अकलूज) व शिवरत्न क्रिकेट अकॅडमी अकलूज मधील विद्यार्थी सुवासिक जगताप याची १९ वर्ष वयोगटाच्या महाराष्ट्र राज्याच्या क्रिकेट संघामध्ये संघाचा उपकर्णधार म्हणून निवड झालेली आहे.

या निवडीबद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माजी खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील, अध्यक्षा आणि शिवरत्न पॅटर्नचे चेअरमन शितल देवी धैर्यशील मोहिते-पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य ,समन्वयक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *