शिवरत्न क्रिकेट अकॅडमीच्या वृषाली पवारची क्रिकेट पंच म्हणून निवड

  • By admin
  • October 8, 2025
  • 0
  • 41 Views
Spread the love

सोलापूर ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत शिवरत्न क्रिकेट अकॅडमी अकलूजची होतकरू खेळाडू वृषाली तुकाराम पवार हिने उल्लेखनीय यश संपादन केले असून ती सोलापूर जिल्ह्यातील एकमेव उत्तीर्ण उमेदवार ठरली आहे. विशेष म्हणजे वृषाली पवार आता सोलापूर जिल्ह्याची पहिली महिला क्रिकेट पंच म्हणून कामकाज पाहणार आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वृषालीचा सत्कार करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक अनिल जाधव, शिवरत्न क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक मंजित नवले व प्रशिक्षक बाळासाहेब रणवरे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *