गायत्री, प्रणाली, अमृता, आशा, जाहिद, तन्मय, गणेश, दिनेश ठरले सर्वोत्तम लिफ्टरचे मानकरी

  • By admin
  • October 8, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

मुंबई : पनवेल येथील व्ही के हायस्कूल येथे कुमार दीपक सुरेखा अरुण पाटकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या रायगड बेंचप्रेस पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गायत्री बडेकर, प्रणाली माने, अमृता भगत, आशा घरत, जाहिद काणेकर, तन्मय पाटील, गणेश तोटे, दिनेश पवार यांनी “सर्वोत्तम लिफ्टर”च्या मान मिळवला. स्पर्धेचे सांघिक विजेतेपद आय एन डी क्लब कर्जतने पटकावले. ही स्पर्धा समस्त पाटकर कुटुंबीयांनी पुरस्कृत केली होती. 

या स्पर्धेत महाड, खोपोली, पेण, पनवेल, कर्जत येथील १०० पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी रायगड भूषण पुरस्कार विजेते डॉ कुमार शिंदे, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंगचे जनरल सेक्रेटरी आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आणि महाराष्ट्र संघटनेचे खजिनदार सूर्यकांत गद्रे, माजी कबड्डीपटू दत्ता पाटकर, ज्येष्ठ योगा शिक्षक रामदास झोपे, पॉवरलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष गिरीश  वेदक, तसेच सदस्य सुभाष टेंबे, माधव पंडित, संदीप पाटकर, सहसचिव सचिन भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. 

या प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिनेश पवार, अमृता भगत, गायत्री बडेकर, नासिर सय्यद या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तसेच राष्ट्रीय गतिमंद स्पर्धेत पदक प्राप्त केल्याबद्दल जितेश साजेकर याचा देखील सत्कार करण्यात आला. स्पर्धेला समाजसेवक प्रदीप घरत, शिवगिरी सेवा संस्थान पनवेलचे अध्यक्ष व उद्योजक प्रसाद दिलीप खोत, खजिनदार मिलिंद पांचाळ यांनी सदिच्छा भेट दिली. 

स्पर्धेच्या सर्व  व्यवस्थापनाची जबाबदारी कार्याध्यक्ष यशवंत अंबाजी मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कृष्णा पाटकर, तन्मय शरद बारणे, संदीप स्वरूप पाटकर यांनी सांभाळली. या स्पर्धेतील विजेत्यांना दैनिक रामप्रहरचे वृत्त संपादक समाधान पाटील, रायगडचे ज्येष्ठ पॉवर लिफ्टिंग खेळाडू माधव पंडित, माजी कबड्डीपटू दत्ता पाटकर, सुभाष टेंबे, राहुल गजरमल, यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सर्वोत्तम लिफ्टर

पुरुष  विभाग
१) सब ज्युनिअर – जाहिद काणेकर (द क्वाडझिला फिटनेस महाड), २) ज्युनिअर – तन्मय पाटील (वैयक्तिक, पेण), ३) सीनियर – गणेश तोटे (फिटनेस ऑन जिम,पनवेल), ४) मास्टर्स – दिनेश पवार (स्पार्टन जिम, खोपोली)

महिला  विभाग
१) सब ज्युनिअर गायत्री बडेकर ,२)ज्युनियर. .प्रणाली माने  (दोघी आय एन डी क्लब कर्जत), ३) सीनियर – अमृता भगत(पॉवर हाऊस क्लब, खोपोली), ३) मास्टर – आशा घरत, (हनुमान व्यायाम शाळा, पेण)

सांघिक विजेतेपद
१) आय एन डी क्लब (कर्जत), २) द क्वाडझिला फिटनेस (महाड), ३) फिटनेसऑन जिम. (तक्का-पनवेल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *