
विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि विस्डम इंग्लिश स्कूल बजाजनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षांखालील मुलांची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. गंगापूर तालुक्यातील तब्बल ३० संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्कंठापूर्ण सामने रंगवले. या स्पर्धेत पी एम ज्ञानमंदिर संघाने विजेतेपद पटकावले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, डायरेक्टर अजगर बेग, संस्थेच्या संचालिका इश्रत बेग, राष्ट्रीय खेळाडू मोहम्मद शेख, बीएसएफचे कोषाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, गंगापूर तालुका क्रीडा संयोजक शेख शफी, तसेच डी पवार, समाधान हराळ, ज्ञानेश्वर सावंत, बर्डे सर, अजित जाधव, कृष्ण पवार, अविनाश पवार, आकाश इंगळे, नारायण शिंदे, ओमप्रकाश वाघमारे, योगेश गांगर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या वेळी संचालिका इश्रत बेग यांनी उपस्थित खेळाडूंना खेळामधील शिस्त, संघभावना आणि परिश्रमाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील पंच म्हणून रामेश्वर वैद्य, शिवराज कीरकंडे, साईराज तांदळे, करण लहाने, प्रशांत भांड, ऋषिकेश ठाकरे, गौरव पवार, कलाभूषण कलावंत, सदावर्ते सर यांनी उत्तम कामगिरी बजावली.
विजेत्या संघाला पदके व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा कैलास जाधव, बजाजनगर स्पोर्ट्स फाउंडेशनचे संचालक मंडळ, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
१४ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेचा अंतिम निकाल
१. पी. एम. ज्ञानमंदिर, रांजणगाव, २. भैरवमल तनवाणी माध्यमिक विद्यालय, बजाजनगर, ३. लिटल एंजल स्कूल, बजाजनगर.