छत्रपती संभाजीनगर महिला संघाचा ३७ धावांनी विजय

  • By admin
  • October 9, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

श्रद्धा आम्ब्रे, अक्षरा अडणेची प्रभावी कामगिरी

छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १५ महिला निमंत्रित एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महिला संघाने अहिल्यानगर महिला संघावर ३७ धावांनी विजय नोंदवला. अक्षरा अडणे हिने सामनावीर पुरस्कार पटकावला.

एमआयटी क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. छत्रपती संभाजीनगर महिला संघाने ३५ षटकात सहा बाद १७७ धावसंख्या उभारली. अहिल्यानगर महिला संघ २८.२ षटकात १४० धावांवर सर्वबाद झाला. छत्रपती संभाजीनगर संघाने ३७ धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात श्रद्धा आम्ब्रे हिने ६९ चेंडूंत ६७ धावांची शानदार अर्धशतकी खेळी साकारली. तिने ११ चौकार मारले. भूमिका बैनाड हिने ८९ चेंडूत ४९ धावा फटकावल्या. तिने पाच चौकार मारले. आराध्या पवार हिने तीन चौकारांसह ३४ धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत अक्षरा अडणे हिने १७ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. या प्रभावी कामगिरीमुळे तिला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. अद्विका भागवतकर हिने १३ धावांत तीन बळी घेत आपला ठसा उमटवला. सृष्टी तांदळे हिने १५ धावांत एक गडी बाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *