
जिल्हास्तरीय शालेय मनपा हद्दीबाहेरील सॉफ्टबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय महानगरपालिका हद्दीबाहेरील शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा आर्य चाणक्य विद्याधाम, जटवाडा येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत आर्य चाणक्य विद्याधाम आणि गायकवाड ग्लोबल या संघांनी दुहेरी मुकुट संपादन केला.
या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, उपमुख्याध्यापक शिवकुमार यन्नावार, उपमुख्याध्यापिका सीमा गंगवाल, तालुका संयोजक गणेश बेटूदे, बाजीराव भुतेकर, पांडुरंग कदम, सादत खान, राहुल सर, बनसोडे सर, सोनवणे सर, तसेच एनआयएस प्रशिक्षक सचिन बोर्डे आणि अमृता शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ग्रामीण जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण १५ संघांनी सहभाग नोंदविला, तर पंच म्हणून भीमा मोरे, यश थोरात, निखिल वाघमारे, कार्तिक तांबे, गौरव साळवे, विशाल जारवाल यांनी उत्कृष्ट काम पाहिले. खेळाडूंच्या जोशपूर्ण खेळामुळे संपूर्ण मैदान उत्साहाने दुमदुमले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१४ वर्षे मुले ः १ आर्य चाणक्य विद्याधाम, छत्रपती संभाजीनगर, २. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल, गंगापूर, ३. संजीवनी अकॅडमी, वैजापूर.
१४ वर्षे मुली : १. के. दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल, वैजापूर, २. गायकवाड ग्लोबल इंग्लिश स्कूल, छत्रपती संभाजीनगर, ३. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल, गंगापूर.
१७ वर्षे मुले : १. आर्य चाणक्य विद्याधाम, छत्रपती संभाजीनगर, २. छत्रपती शिवाजी प्रीपरेट्री ज्युनियर कॉलेज, गंगापूर, ३. संजीवनी अकॅडमी, वैजापूर.
१७ वर्षे मुली : १. गायकवाड ग्लोबल स्कूल, छत्रपती संभाजीनगर, २. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल, गंगापूर, ३. होली फेथ इंग्लिश स्कूल, सिल्लोड.
१९ वर्षे मुले : १. छत्रपती शिवाजी प्रीपरेट्री ज्युनियर कॉलेज, गंगापूर, २. आर्य चाणक्य विद्याधाम, छत्रपती संभाजीनगर.
१९ वर्षे मुली : १. गायकवाड ग्लोबल स्कूल, छत्रपती संभाजीनगर, २. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल, गंगापूर.