
महिला टी २० चॅम्पियनशिप ः गायत्री मोहिते, रुपाली सहारे सामनावीर
नागपूर ः महिला टी २० चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्या सामन्यात के ४ ब्लास्टर संघाने माही बॅटलर संघावर सात विकेट राखून मोठा विजय संपादन केला. दुसरा सामना रोमांचक ठरला. हा सामना के ४ ब्लास्टर संघाने अवघ्या ७ धावांनी जिंकला हे विशेष. या सामन्यांमध्ये गायत्री मोहिते, रुपाली सहारे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पांडव कॉलेज मैदानावर ही स्पर्धा आहे. माही बॅटलर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात नऊ बाद ८८ धावा काढल्या. के ४ ब्लास्टर संघाने १८.१ षटकात तीन बाद ८९ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला. गायत्री मोहिते हिने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
या सामन्यात रुपाली सहारे हिने तीन चौकारांसह ३४ धावा काढल्या. अचल शाहू हिने चार चौकारांसह ३३ ध वा फटकावल्या. कृष्णा धुरिया हिने १९ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत गायत्री मोहिते हिने १६ धावांत तीन विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. मुक्ता हिंज हिने २ धावांत दोन गडी बाद केले. अनुष्का निनावे हिने १२ धावांत एक बळी टिपला.

रॉकेट टीम पराभूत
के ४ ब्लास्टर संघाने रोमांचक सामन्यात रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स टीमचा अवघ्या ७ धावांनी पराभव करुन सलग दुसरा विजय साकारला. या सामन्यात के ४ ब्लास्टर संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात एक बाद १०९ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघ २० षटकात सात बाद १०२ धावा काढू शकला. के ४ ब्लास्टर संघाने ७ धावांनी विजय साकारला.
या रोमांचक सामन्यात रुपाली सहारे हिने ६८ चेंडूंत ६५ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. तिने पाच चौकार मारले. अक्षया सुडके हिने तीन चौकारांसह २६ धावा काढल्या. मुक्ता हिंज हिने १९ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत गायत्री मोहिते हिने २२ धावांत तीन गडी बाद केले. अनुष्का निनावे (१-१२) व आर्या पारवे (१-१२) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.