
नवी दिल्ली ः भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधूची तिसऱ्यांदा बीडब्ल्यूएफ अॅथलीट्स कमिशनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तिचा कार्यकाळ २०२९ पर्यंत राहणार आहे.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती आणि अनुभवी भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची तिसऱ्यांदा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) अॅथलीट्स कमिशनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक संघटनेने शुक्रवारी नोव्हेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२९ या कालावधीसाठी नवीन सदस्यांची घोषणा केली.
सिंधूने यापूर्वी २०१७ ते २०२५ पर्यंत आयोगात काम केले आहे. २०२० पासून त्या बीडब्ल्यूएफ इंटिग्रिटी अॅम्बेसेडर आहेत. अॅथलीट्स कमिशनमध्ये तिला एन से यंग (कोरिया), दोहा हानी (इजिप्त), जिया यी फॅन (चीन) आणि डेबोरा जिले (नेदरलँड्स) यांच्यासोबत नियुक्त करण्यात आले होते. आयोगात सेवा देण्यासाठी फक्त या पाच खेळाडूंना नामांकन देण्यात आले असल्याने कोणत्याही निवडणुकीची आवश्यकता नव्हती.