
छत्रपती संभाजीनगर ःजिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत एमजीएम क्लोवर डेल शाळेचा विद्यार्थी सोहम कटारे याने १७ वर्षांखालील वयोगटात तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि दोन स्पर्धांमध्ये प्रथम आणि एका स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले. ऋषी सोनवणे याने तिसरे स्थान मिळवले.
शानदार कामगिरी बजावत सोहमने राज्यस्तरीय स्पर्धेत जाण्यासाठी आपले स्थान निश्चित केले आहे. पुढील राज्यस्तरीय स्पर्धा १५ ते १७ ऑक्टोबर रोजी लातूर येथे होणार आहे. या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या संचालिका डॉ अपर्णा कक्कड आणि उप संचालिका डॉ नम्रता जाजु तसेच शाळेच्या प्राचार्य रितेश मेहता आणि उपप्राचार्य वर्षा पोतदार आणि क्रीडा शिक्षक सागर शेवाळे प्रिया गायकवाड, किरण सोनकांबळे, फडके यांनी मुलांना मार्गदर्शन केले आहे.