मुलं आणि मुलींचे दोन्ही संघ जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत विजेते
चाळीसगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आणि ग्रेस अकॅडमी चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षांखालील शालेय जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत चाळीसगावतच्या के आर कोतकर ज्युनिअर कॉलेजने मुले आणि मुलींच्या गटात उत्तुंग कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोन्ही संघांची निवड आता धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. के आर कोतकर ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य, शिस्तबद्धता आणि संघभावना दाखवून प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ अजय काटे, उपप्राचार्य डॉ पूनम निकम, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा अनिल मगर आणि क्रीडा संचालक प्रा खुशाल देशमुख यांनी विजेत्या संघांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. पुढील विभागीय स्पर्धेसाठी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी आणि महाविद्यालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. यात चेअरमन नारायण अग्रवाल, व्हाईस चेअरमन योगेश अग्रवाल, सीनियर कॉलेज कमिटी चेअरमन सुरेश स्वार, ज्युनिअर कॉलेज कमिटी चेअरमन नानाभाऊ कुमावत, संस्थेचे अध्यक्ष आर सी पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ विनोद कोतकर, ए बी मुलींच्या हायस्कूलचे चेअरमन प्रदीप अहिरराव, क्रीडा समिती अध्यक्ष योगेश करनकाळ, कार्यालयीन प्रमुख हिम्मत अंदोरे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सचिन निकम, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी आणि तालुका क्रीडा समन्वयक अजय देशमुख यांचा समावेश आहे.
या दोन्ही विजयी संघांच्या यशामागे सतत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारे माजी मुख्याध्यापक बाबा सोनवणे, उपमुख्याध्यापिका सीमा माळकर, प्रवीण राजपूत, प्रा. खुशाल देशमुख, परेश पवार, कल्पेश चौधरी, निखिल आगोने, शुभम बच्चे आणि बंटी गवळी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. के आर कोतकर ज्युनिअर कॉलेजच्या दुहेरी विजयानंतर चाळीसगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून, महाविद्यालयातील खेळाडूंच्या प्रतिभेला मिळालेल्या यशामुळे संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेत भर पडली आहे.