छत्रपती संभाजीनगर ः जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त नांदेड येथे नांदेड महानगरपालिका शांताराम सांगणे जलतरण तलावावर मराठवाडा विभागीय जलतरण स्पर्धा संपन्न झाली. यात सुमारे २५० जलतरणपटूंनी सहभाग घेतला. त्यात छत्रपती संभाजीनगरचे ओम गाडेकर, साई गाडेकर, सई गाडेकर, अर्णव जाधव, गणेश नागरगोजे, तेजस दामेधार, सई नुलवी यांनी भाग घेतला.
यात साई ४ सुवर्ण, १ रौप्य, सई २ सुवर्ण १ रौप्य, १ कांस्य , ओम ३ रौप्य, १ कांस्य, राम १ कांस्य ,अर्णव २ रौप्य व १ कांस्य, तेजस १ कांस्य अशा पदकांची कमाई केली. विशेषत: नुकत्याच शिकलेल्या गणेश व छोटा साई यांनी चांगली कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे मुलांनी जागतिक कर्णबधीर दिवसाचे औचित्य साधून सर्वांनी मिळालेले यश सागरला समर्पित केले. संयोजकांकडून सागरचे कौतुक व त्याला शुभेच्छा दिल्या.