परभणी ः परभणी येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने तक्षशीला इंग्लिश स्कूल गंगाखेड रोड येथे झालेल्या जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत बाल विद्याविहार प्रशालेने उल्लेखनीय कामगिरी करत १७ वर्षे वयोगटात विजेतेपद पटकावले. तसेच १९ वर्षे व १४ वर्षे वयोगटात उपविजेतेपद मिळवून प्रशालेने तीनही गटांमध्ये प्रभावी कामगिरीची नोंद केली आहे.
विजेत्या १७ वर्षे मुलांच्या संघामध्ये प्रवीण धोंडिराज आळसे, धीरज देविदास चौधरी, मोहम्मद अजाम अली शाह मोहम्मद मुश्ताख अहमद, विराग मिथुन संघई व श्रीनाथ संतोषराव भोसले या खेळाडूंचा समावेश होता. या संघाची विभागीय स्तरावर निवड झाली असून, पुढील फेरीत ते परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
१४ वर्षे वयोगटातील उपविजेतेपद मिळवलेल्या संघामध्ये नितीश गोपाळ भूतडा, सर्वज्ञ सम्राट कोरडे, सुमित ज्ञानेश्वर खुणे, आदित्य मनोज राऊत, अर्जुन रितेश चापके व श्रीकांत प्रल्हाद मोरे यांचा समावेश होता. तर १९ वर्षे वयोगटात उपविजेते ठरलेल्या संघात अक्षय अशोक मुळे, सिद्धेश अशोकराव चव्हाण, सुयश संदीप सिसाळ, सोहम राम खरबे, अधिराज अभय देशमुख आणि सोहम हरिश्चंद्र बोचरे या विद्यार्थ्यांनी चमकदार खेळी सादर केली.ॉ
या यशाबद्दल बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ एन ए झरकर, सचिव डॉ विवेक नावंदर, सर्व संचालक मंडळ, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन गोरडकर, विजयश्री कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, क्रीडा शिक्षक आदित्य गायकवाड आणि सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजेत्या संघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.संस्थेच्या वतीने सर्व खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून, प्रशालेने क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करत जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेत भर घातली आहे.