
प्रशिक्षक सागर बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणपटूंची उत्कृष्ट कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः एमपीपी स्पोर्ट्स पार्कच्या जलतरणपटूंनी नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागीय जलतरण स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी सादर करत जिल्ह्यातील जलतरण क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. १४ वर्षे, १७ वर्षे व १९ वर्षांखालील या तीन वयोगटांतील खेळाडूंनी एकापेक्षा एक उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवली.

या यशामागे एनआयएस कोच आणि छत्रपती पुरस्कार विजेते सागर बडवे, कांचन बडवे आणि राजीव बडवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. हे तिघेही प्रशिक्षक दररोज सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत खेळाडूंना काटेकोर प्रशिक्षण देतात. तसेच प्रणव मिटकरी आणि अनिता सिन्नरकर हे प्रशिक्षक सकाळी ९ ते १० आणि संध्याकाळी ८ ते ९ या वेळेत खेळाडूंना पूरक मार्गदर्शन करतात.
अभिनंदन व गौरव
या उल्लेखनीय यशाबद्दल अॅड गोपाळ पांडे, अॅड संकर्षण जोशी, प्राचार्य मकरंद जोशी, माजी नगरसेवक विनायक पांडे, अॅड किरण कुलकर्णी, प्रा रावसाहेब सांगळे, महेंद्र रंगारी, सतीश काळे, धीरज सुरकुंडे, प्रभाकर मते, शिवाजी कचरे, अंकुश तळेगावकर, सोनाजी बिरोटे, आणि प्रभाकर पांडे प्रतिष्ठानचे सर्व सभासद यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एमपीपी पांडे स्पोर्ट्स पार्कने आपल्या जलतरणपटूंमधून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की नियमित प्रशिक्षण, काटेकोर शिस्त आणि अनुभवी मार्गदर्शन यांच्या जोरावर यश निश्चित मिळवता येते. या स्पर्धेत मिळालेले यश ही संस्थेच्या क्रीडा संस्कारांची साक्ष आहे.
विजेत्या जलतरणपटूंची यशस्वी कामगिरी
शिवानंद कुलकर्णी (प्रथम २०० मीटर फ्रीस्टाइल, द्वितीय १०० मीटर फ्रीस्टाइल), युग वहाटूळे (प्रथम २०० मीटर बॅकस्ट्रोक, तृतीय १०० मीटर बॅकस्ट्रोक), गणेश नागरगोजे (द्वितीय ५० मीटर फ्रीस्टाइल, द्वितीय १०० मीटर फ्रीस्टाइल), इंद्रनील बळी (प्रथम २०० मीटर बटरफ्लाय), साक्षी पठारे (प्रथम ५० मीटर फ्रीस्टाइल, द्वितीय १०० मीटर फ्रीस्टाइल), दिगंबर घुगासे (प्रथम १०० मीटर बटरफ्लाय, द्वितीय ४०० मीटर फ्रीस्टाइल, तृतीय १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक), श्रेयस कुलकर्णी (प्रथम २०० मीटर फ्लाय, द्वितीय २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, द्वितीय २०० मीटर इंडिव्हिज्युअल मेडले).
या सर्व जलतरणपटूंनी अतिशय शिस्तबद्ध व आत्मविश्वासपूर्ण प्रदर्शन करीत एमपीपी स्पोर्ट्स पार्कचे नाव उज्ज्वल केले आहे.