छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जुनियर गटाच्या (१५ वर्षावरील आणि २१ वर्षाखालील) जिल्हा निवड चाचणी ज्यूदो स्पर्धा रविवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता एन-३ सिडको, किटली गार्डन समोर संघटनेच्या ज्यूदो हॉलवर आयोजित केली आहे.
या निवड चाचणी स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांनी येताना जन्म दाखला, आधार कार्ड व शाळेनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र यांची मूळ प्रत व एक झेरॉक्स सोबत स्पर्धेला घेऊन यायचे आहे असे स्पर्धा संचालक दीप्ती शेवतेकर यांनी सांगितले आहे.
या निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त मुले व मुलींनी सहभाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे व सचिव अतुल बामणोदकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संघटनेचे तांत्रिक समितीचे सचिव अमित साकला (९६७३००१२४१) यांच्याशी संपर्क करावा, असे सचिव अतुल बामणोदकर यांनी सांगितले.