
सोलापूर ः शालेय शहर कबड्डी स्पर्धेत श्री मल्लिकार्जुन हायस्कूलने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले. या कामगिरीवर संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राजीव गांधी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेत त्यांनी १७ वर्षाखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक संपादला. संघास क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके, परमेश्वर चांदोडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थापक आप्पासाहेब हत्तुरे, संस्थेचे अध्यक्ष सिद्धप्पा वरनाळ, माजी प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे, धरेप्पा हत्तुरे, प्र. मुख्याध्यापक रमेश दिंडोरे यांनी अभिनंदन केले.