नागपूर टायटन्स, साबा वॉरियर्स संघांचे दणदणीत विजय 

  • By admin
  • October 11, 2025
  • 0
  • 75 Views
Spread the love

मुस्लीम क्रिकेट चॅम्पियनशिप ः मोहिब मेमन आणि मोहम्मद इम्रान सामनावीर 

नागपूर ः करीम स्पोर्ट्स अकॅडमी नागपूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत साखळी सामन्यात नागपूर टायटन्स आणि साबा वॉरियर्स या संघांनी दणदणीत विजय नोंदवले. या सामन्यांमध्ये मोहिब मेमन आणि मोहम्मद इम्रान यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला. या गटात साबा वॉरियर्स विरुद्ध नागपूर टायन्स असा अंतिम सामना रविवारी रंगणार आहे. 

एनसीए नागपूर मैदानावर हे सामने झाले. पहिल्या सामन्यात ताडोबा टायगर्स संघाने १७.४ षटकात नऊ बाद ९१ धावा काढल्या. नागपूर टायटन्स संघाने ४.५ षटकात सहा  बाद ९२ धावा काढून चार विकेटने सामना जिंकला. या सामन्यात बंटी सय्यद (३५), तौसिफ अहमद (३०), समीर खान (२९) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत मोहिब मेमन (३-१७), सय्यद फूरकान रझवी (३-१७) व तौसिफ अहमद (३-२७) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. 

दुसरा सामना साबा वॉरियर्स संघाने आठ विकेट राखून जिंकत आगेकूच कायम ठेवली. साबा वॉरियर्स संघाने रॉकेट इंटरनॅशनल स्पार्टन्स संघाचा मोठा पराभव केला.

या सामन्यात मोहम्मद इम्रान (६७, आठ षटकार व दोन चौकार), तल्हा अन्सारी (३४), मोहम्मद करीम (३०) यांनी दमदार फलंदाजी केली. गोलंदाजीत मोहम्मद अनस (२-२३), अयान हुसेन (२-३८), हसनैन हुसेन (१-७) यांनी प्रभावी गोलंदाजी करुन आपला ठसा उमटवला. 

मुस्लिम लीग अंतिम सामना 

साबा वॉरियर्स विरुद्ध नागपूर टायटन्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *