
मुंबई ः महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व ओएनजीसी पुरस्कृत मलबेरी कॉटेज, महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत जळगावच्या संदीप दिवेने पुण्याच्या रहीम खानचा १९-१६, २५-८ असा सहज फडशा पाडून पांचव्या फेरीत प्रवेश केला. रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाण याने मुंबई उपनगरच्या जितेश कदमला पराभूत केले.
स्पर्धेचे उद्घाटन महाबळेश्वर येथे आपत्ती बचाव कार्य करणारे पोलीस मित्र सुनील भाटिया यांच्या हस्ते झाले. मलबेरी ग्रुपचे अजय शिंदे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ओएनजीसीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू, अशोक गौर, संदीप देवरुखकर, राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, योगेश फणसळकर, दत्तप्रसाद शेंबेकर, सातारा हौशी कॅरम असोसिएशनचे सुनील चतुर देखील या वेळी उपस्थित होते.
पुरुष एकेरी चौथ्या फेरीचे निकाल
गिरीश तांबे (मुंबई) विजयी विरुद्ध गणेश तावरे (पुणे), महम्मद घुफ्रान (मुंबई) विजयी विरुद्ध सागर भोसले (पुणे), सिद्धांत वडवलकर (मुंबई) विजयी विरुद्ध निलांश चिपळूणकर (मुंबई), अभिषेक चव्हाण (रत्नगिरी) विजयी विरुद्ध जितेश कदम (मुंबई उपनगर), सागर वाघमारे (पुणे) विजयी विरुद्ध शाहिद बागवान (सातारा), ओमकार नेटके (मुंबई) विजयी विरुद्ध समीर अन्सारी (ठाणे), सौरभ मते (मुंबई) विजयी विरुद्ध कुणाल राऊत (ठाणे), फ्रान्सिस फर्नांडिस (मुंबई) विजयी विरुद्ध राहुल सोळंकी (मुंबई), विकास धारिया (मुंबई) विजयी विरुद्ध नंदू सोनावणे (पुणे), झैद अहमद फारुकी (ठाणे) विजयी विरुद्ध वसीम खान (पुणे).