
ब गटामध्ये पंजाबचा दानिश वर्मा तर क गटामध्ये पश्चिम बंगालचा अर्कप्रोवो चौधरी चॅम्पियन्सचे मानकरी
पुणे ः इंडियन गोल्फ यूनियन च्या वतीने आयोजित ज्युनियर गोल्फ चॅम्पियन २०२५ चा अ गटातील (१५ ते १७) ज्युनियर चॅम्पियन चषकाचा मानकरी महाराष्ट्राचा शशांक गद्रे ठरला. तर अनुक्रमे ब गटातील (१३ ते १५) ज्युनियर चॅंपियन्स पंजाबचा दानिश वर्मा ठरला त्याचप्रमाणे क गटातील (११ ते १३) ज्युनियर चॅम्पियन्सचा मानकरी पश्चिम बंगालचा अर्कप्रोवा चौधरी ठरला.
ही गोल्फ राष्ट्रीय स्पर्धा पुण्यातील पुना गोल्फ क्लब येरवडा येथे आयोजित केली होती. या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन इंडियन गोल्फ युनियनने पुना गोल्फ क्लबच्या सहकार्याने आयोजित केले होते. या वर्षीच्या लीगचे पुण्यातील येरवडा गोल्फ कोर्स येथे दिमाखदार असे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेला देशभरातील अनेक खेळाडू आणि त्यांचे संघ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .
या ज्युनियर गोल्फ लीग मध्ये अ गटातून दुसऱ्या क्रमावर चंदिगडचा नेल जॉली तर तिसऱ्या क्रमांकावर चंदिगढचा हरिजल मिका सिंग ठरला. दुसऱ्या ब गटातील (१३ते १५ ) उपविजेता दिल्ली च्या साक्षीत पुरंदरे तर तृतीया स्थानी हरियानाचा जयबीर सिंग कांग ठरला.तिसऱ्या गटातील (११ ते १३ ) पंजाबचा सोहरब सिंग तलवार उपविजेता तर तृतीय क्रमांक महाराष्ट्राच्या विहान गजूला ठरला. तिन्ही गटातील जूनियर चॅंपियन्स गोल्फ स्पर्धा या अतिशय चुरशीच्या झाल्या .पूर्ण देशभरातील सर्व राज्यातून मोठ्या प्रमाणात विविध गटातील गोल्फ खेळाडू सहभागी झाले होते.
या वेळी विजेत्यांचा सन्मान व चषक पुना गोल्फ क्लबचे कप्तान इक्रम खान व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुन्हा गोल्फ क्लबचे कप्तान इक्रम खान यासह देशभरातील विविध संघाचे प्रायोजक, कॅप्टन आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडियन गोल्फ युनियनच्या गतीने आयोजित या ज्युनियर गोल्फ चॅम्पियन २०२५ मध्ये देशभरातील विविध राज्यातून फार मोठ्या प्रमाणात स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले होते. गेल्या चार दिवसात पुणेकर क्रीडा रसिकांना अतिशय चुरशीची गोल्फ स्पर्धा अनुभवता आली.