साक्री न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रमोद बेडसे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

  • By admin
  • October 13, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

​साक्री (बन्सीलाल बागुल) ः साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साक्री येथील प्राचार्य आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रमोद बेडसे यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षण विभागातर्फे अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, साक्री तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. एक कार्यक्षम प्रशासक असण्यासोबतच ते इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने शैक्षणिक प्रगतीचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यांची शैक्षणिक निष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रति असलेले समर्पण यामुळे त्यांना या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवडण्यात आले.

​संस्थेकडून अभिनंदन
​प्राचार्य प्रमोद बेडसे यांना हा बहुमान मिळाल्याबद्दल साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संपूर्ण परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यात प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष पराग बेडसे, सेक्रेटरी अनिल सोनवणे, विश्वस्त गजेंद्र भोसले, दीपक अहिरराव, संजू पाटील, उत्तमराव बोरसे यांचा समावेश आहे.

​तसेच, व्यवस्थापक मंडळ सदस्य उज्वला बेडसे, लाला मोरे, सुनिता नाईक यांच्यासह विद्यालयाच्या उपप्राचार्या प्रतिभा शिवदे, उपमुख्याध्यापक विलास गोसावी, पर्यवेक्षक अविनाश सोनार, बन्सीलाल बागुल, सतिष सोनवणे आणि संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. प्रमोद बेडसे यांचा हा सन्मान साक्री तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *