
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू हर्ष पाटील याने राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत रिले प्रकारात कांस्य पदक जिंकले.
भुवनेश्वर या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना हर्ष पाटील याने रिले प्रकारात सांघिक कांस्यपदकाची कमाई केली. हर्ष पाटील याला एनआयएस प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हर्ष पाटील हा कलावती चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिवाजीनगर या ठिकाणी दहावी इयत्तेत शिकत आहे. हर्षच्या शानदार कामगिरीबद्दल एनआयएस आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ, क्रीडा प्रबोधिनी प्राचार्य पूनम नवगिरे यांनी अभिनंदन केले आहे.