
विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा उत्साहात संपन्न
लातूर ः लातूर येथे विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत लातूर, नांदेड, धाराशिव येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत विभागीय संघात आपले स्थान निश्चित केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या अंतर्गत लातूर जिल्हा धनुर्विद्या क्रीडा संघटनेच्या सहकार्याने लातूर विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन मुकुंदराज विद्यालय साई रोड नांदगाव लातूर येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले.
लातूर जिल्हा धनुर्विद्या क्रीडा संघटनेचे सचिव आणि राज्य धनुर्विद्या संघटनेच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष अशोक जंगमे, सहसचिव राजकुमार देवकर व धाराशिव जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या शुभांगी रोकडे-दळवी, शिवछत्रपती अवॉर्ड विजेते अमोल बोरिवले, नांदेड जिल्हा संघटना सचिव वृषाली जोगदंड, संदीप नकाशे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. पंच म्हणून सागर मोहिते, नवनाथ गरगटे, कैलास लांडगे, मारुती बिरादार, हनुमंत केसरे, संदीपान माळी, बाबासाहेब बिरादार यांनी काम पाहिले.
ही स्पर्धा १४ वर्ष, १७ वर्ष, १९ वर्ष वयोगटातील मुले व मुली अशा गटात घेण्यात आली. विजयी खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी लातूर विभागीय संघात निवड झाली आहे.
सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, सुरेंद्र कराड, लातूर जिल्हा धनुर्विद्या क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे, सचिव अशोक जंगमे, महेश पाळणे, प्रवीण गडदे, सुधीर पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या गटामध्ये लातूर, धाराशिव, नांदेडच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला व विभागीय संघात स्थान मिळवले.
स्पर्धेत चमकलेले खेळाडू
मुलांचा गट ः समर्थ भेदे,अद्रित करायचुरकर, विनीत भुजबळे, आर्यन तीडोळे, असच शेख, प्रथमेश नकाशे, रुद्रप्रतापसिंग बागल, अर्णव सोळंकी, सिद्धेश्वर शेटे, सिद्धांत सावंत, गोकुळ बिरादार, विक्रांत पाटील, अर्णव वांगीकर, कृष्णा यादव, कृष्णा दुयेवाड, रिशांक गडकर, ज्ञानेश चेरले, शौर्य मेघाले, सिद्धेश गीते, यशदीप रोकडे, संजय कांबळे, अजिंक्य फाजगे, सूर्या पाटील, प्रतीक फाजगे, आर्यन खरड, यूशान माने, अर्जुन बागल सुशांत चव्हाण, श्रीशांत केसरे, अभिनव जानराव, श्रवण जामदार, परिश पाटील, वैभव शेरकर, योगीराज पवार, गणेश भारती, सोमनाथ जोगी.
मुलींचा गट ः शिवानी पाटील, अक्षरा इरपे, सुमेधा गोडगे, रूपाली बिजले, अक्षरा येरडलावार, प्रतीक्षा सिद्धीवाल, प्रियंका सोनटक्के, स्नेहा अदाटे, आराध्या जगताप, आरती पंडागळे, गायत्री कांबळे, अपेक्षा जगदाळे, गौरवी बोळशेटे, अंकिता वांगीकर, समीक्षा इबितदार, रोहिणी शिरसले, श्रावणी देशमाने, अक्षता क्षीरसागर, नंदिनी करंडे, मधुरा पांडुर्लीकर, अक्षरा राठोड, धनश्री नरवाडे, सिद्धी बारदेवाड, राजश्री पंडागळे, साक्षी चव्हाण, शरयू इंद्राळे, आभा डागा, अभिरुची पाठक, प्रेरणा मुंडे, शर्वरी वाघमारे, अमृता नरटे, संस्कृती आरसुले, मारीयानाज पठाण, श्रुतिका कुतबळ, तेजश्री नरवाडे, सानवी दुर्गे.