
छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर विभागास सर्वसाधारण उपविजेतेपद
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७, १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेत पुणे विभागाने सर्वसाधारण विजेतेपद तर छत्रपती संभाजीनगर विभाग आणि कोल्हापूर विभागाने सर्वसाधारण उपविजेतेपद संपादन केले आहे.
विभागीय क्रीडा संकुल येथे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेमधून महाराष्ट्रातील आठ विभागातील एकूण ३०० खेळाडू, संघ व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते. सदर क्रीडा स्पर्धा या राज्य महाराष्ट्र वूशु संघटनेचे अधिकृत पंच व अधिकारी यांच्या तांत्रिक सहकार्याने संपन्न झाली आहे. या क्रीडा स्पर्धेतून प्रत्येक वजन गटातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १७ वर्षांखालील मुले व मुलींची राष्ट्रीय वुशू स्पर्धा श्रीनगर, जम्मू येथे २७ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
१७ वर्षांखालील मुले व मुलींच्या प्रत्येक वजनी गटातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या वयोगटातील सर्वसाधारण विजेतेपद पुणे विभाग व सर्वसाधारण उपविजेतेपद छत्रपती संभाजीनगर विभागाने पटकावले. छत्रपती संभाजीनगर संघाला जिल्हा सचिव महेश इंदापूरे यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
१९ वर्षांखालील मुले व मुलींच्या प्रत्येक वजनी गटातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई व इतर मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या वयोगटातील सर्वसाधारण विजेतेपद पुणे विभाग व सर्वसाधारण उपविजेतेपद कोल्हापूर विभागाने पटकावले.
पदक विजेते खेळाडू (सुवर्ण, रौप्य व कांस्य)
१७ वयोगट मुले
आदित्य चव्हाण, करण यादव, वीर राठोड, तन्मय पाटील, वीरा परदेशी, दिवाकर पांडे, मानस मुरठे, चैतन्य देवतले, ऋषिकेश चौधरी, मयूर पाटील, मोहम्मद गुलजार समानी, शिवतेज रायबन, सुमित कांबळे, सिद्धेश्वर राठोड, श्रेयस कळंत्रे, रोहन वाजे, हर्षित चव्हाण, श्रेयस वराट, जॉर्डन जॉन्सन, रुद्राक्ष पाटील, दिव्यांशु कठैत, गोवर्धन नलावडे, मानव हडपे, वेदांत बालपांडे, गणेश गुणाले, श्री संतोष चोरमले, हिमांशु रावेकर, समाधान गायकवाड, श्रेयस शेळके, अर्णव वडीचार, प्रज्वल ढवळे, हर्षल वराळे, अनुग्रह दमाहे, अंश मौर्य.
१७ वयोगट मुली
अनुष्का जैन, रिया ढेकवार, भार्गवी गवळी, रुकसान यास्मिन, आयुषी घेवारे, गायत्री भोयर, पवित्रा दर्जी, सुकन्या दोड्डाळे, जवेरिया शेख, प्रज्ञा वडोदे, काव्या शर्मा, माधुरी धनगर, जान्हवी लोढा, हिना मसुरके, श्रावणी भोसले, हंसिका महानूर, शर्वरी राठोड, लक्ष्मी रावत, राधा बावणे, तनिष्का पाटील, सेजल तायडे, मुस्कान शेख, वंशिका राहाटे, माही जाधवराव, श्रुती राजमाने, समायरा स्वामी, अवंतिका मधु.
१९ वयोगट मुले
किरण आपकारी, अथर्व कुरुंदवाडे, प्रणयय रामटेके, महंमद हुसेन इस्माईल लोहार, सिद्धांत भोसले, अमित कुंवर, एकनाथ पाटील, जय मिश्रा, क्षितिज मराठे, प्रथमेश बोंगाडे, आदर्श टेकाम, विनोद मोरे, शुभम जाधव, शुभम शिरसाठ, सारंग ठाकरे, अर्णव शर्मा, वैभव अंभोरे, कार्तिक पाटील, सत्यजित संकपाळ, शुभम बघेल, साहिल बसरे, तेजस तुलावी, वेदांत निकम, बिभीषण चव्हाण, उबेद आतार, अंकेश शर्मा, दुर्वाशा यादव, पियुष हवालदार, अवधूत पाटील, साईराज नन्नावरे, प्रथम चित्रौडा, रोहित बोकडे, कार्तिक निकड, यथार्थ पवार, ओम सिंग, पार्थ घाडगे, तन्मय चव्हाण, पवन सोनवणे, शिवराज पाटील, राहुल पटेल.
१९ वयोगट मुली
शिवा द्विवेदी, दिव्या वाघ, सुकन्या आगळे, श्रेया थोलार, स्नेहा दुधमल, सरस्वती रोंगे, आदिती पाटील, कुमुदिनी बिसेन, श्रावणी घोरपडे, ज्ञानेश्वरी दानवले, अनुष्का चौधरी, चिन्मयी भोईर, गायत्री ओव्हाळ, मनस्वी तायडे, धनश्री वाघमारे, मंजिरी सरोदे, समीक्षा चन्ने, अनुराधा फुगे, प्रांजली चटप, अनुष्का पाटील, मयुरा वाईगडे, अक्षरा ठाकरे, इशिता शिंदे, श्रद्धा राजेशिर्के, अहिल्या लवटे, दिशा दुबे, चैत्राली लांडगे, संतोषी सावरकर, लाँरिया पगाडे, सानिका जाखलेकर, बैसाली मंडल, प्रियांका मनगटे.