सबर्बन मुंबई ज्युनियर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

  • By admin
  • October 14, 2025
  • 0
  • 73 Views
Spread the love

मुंबई ः तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या अधिकृत संघटनेशी संलग्न असलेल्या तायक्वांदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबई या संघटनेतर्फे माजी अध्यक्ष विनायक गायकवाड यांच्या स्मरणार्थ २४वी ज्युनियर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा व १०वी ज्युनियर पुमसे स्पर्धा सोमवारी (२० ऑक्टोबर) सेंट अँथनी हायस्कूल, खैरानी रोड, साकीनाका येथे आयोजित करण्यात येणार आहे. 

सदर स्पर्धा या तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या नियमा प्रमाणे होतील. या स्पर्धेत सबर्बन मुंबई जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेण्यात यावा. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू हे रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धत सबर्बन मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

अधिक माहितीसाठी सचिव संदीप चव्हाण (८१६९६५६१८८), खजिनदार कल्पेश गोलांबडे (९५९४५९४४४५५) यांच्याशी संपर्क करावा. तायक्वांदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप येवले यांनी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेण्यात यावा असे सर्वांना आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *