
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आयोजित इंटर कॉलेजिएट तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पायल घुगे हिने महिला गटातील ५७ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर गिरीश बढगुजर याने द्वितीय क्रमांक मिळवून संस्थेचा मान उंचावला आहे. या विद्यार्थ्यांना एमआयटी शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले.
या शानदार यशाबद्दल एमआयटी समुहाचे महासंचालक प्रा मुनीश शर्मा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ निलेश पाटील, डॉ बाबासाहेब सोनवणे, डॉ अमित रावते आणि विलास त्रिभुवन यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.