
तुळजापूर (जि. धाराशिव) ः जिल्हा क्रीडा कार्यालय धाराशिव व सॉफ्टबॉल असोसिएशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्घाटन सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजिनाथ घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य वैजिनाथ घोडके यांचा सत्कार जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष इसाक पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आलेल्या सर्व क्रीडा शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सहसचिव विष्णू दळवी, राजेश बिलकुले, रणविजय कटंबे, निरज कटंबे, प्रभाकर काळे, गणेश कोळी, मधुकर जाधव व सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव अनिल धोत्रे उपस्थित होते. स्पर्धेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेचे सचिव अनिल धोत्रे यांनी केले. व्यवहारे यांनी आभार मानले.