
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनतर्फे अहिल्यानगर येथे योनेक्स सनराईज माजी आमदार अरुण काका बलभीमराव जगताप मेमोरियल महाराष्ट्र आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील अंडर १७ वयोगटातील मुलांच्या संघाने पालघर संघाचा पराभव करून कांस्य पदक पटकावले.
या सांघिक स्पर्धेत सार्थक नलावडे, उदयन देशमुख, आदित येनगेरेड्डी, आयुष तुपे आणि ओंकार निकम यांनी सहभाग नोंदवला. संघ प्रमुख व प्रशिक्षक म्हणून अतुल कुलकर्णी आणि परीक्षित पाटील यांनी जबाबदारी पार पडली.
या यशाबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष शिरीष बोराळकर, जिल्हा उपाध्यक्ष वीरेन पाटील, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सरचिटणीस सिद्धार्थ पाटील, हिमांशू गोडबोले, अमित सानप, ऋतुपर्ण कुलकर्णी, चेतन तायडे, जावेद पठाण, सदानंद महाजन, सचिन कुलकर्णी, निकेत वराडे यांनी अभिनंदन केले आहे.