
पुणे ः सहारनपूर (उत्तर प्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय जु-जुत्सू स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण सहा पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध वयोगट व वजन गटांमध्ये दमदार झुंज देत राज्याचे नाव उज्ज्वल केले.
पदक विजेते खेळाडू
संतोष चोरमले (कांस्य पदक ), शंकर मालुसरे (रौप्यपदक), रेश्मा गोरे (कांस्य पदक), प्रियांक राव (रौप्य पदक), गौरव ठाकूर (कांस्य पदक), सद्दाम हुसेन (कांस्य पदक).
याशिवाय आयुष बोराणा आणि पुरुषोत्तम निर्फल यांनीही उत्कृष्ट प्रदर्शन करून महाराष्ट्राच्या कामगिरीत भर घातली. या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू बालकृष्ण शेट्टी, तसेच प्रशिक्षक संतोष चोरमले आणि सौरभ किनहोळकर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व विजेत्या खेळाडूंना पुणे शहर जु-जुत्सू असोसिएशनचे सचिव राजेश पुजारी आणि अध्यक्ष राजेश धिवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या या दमदार कामगिरीमुळे राज्यातील जु-जुत्सू खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सर्व संघ अधिक जोमाने तयारी करत आहेत.