
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सिद्धार्थ जलतरण तलाव येथे शालेय विभागीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संस्कार इंग्लिश हायस्कूलचा रोहन सोनवणे याने उत्कृष्ट कामगिरी कामगिरी करत मुलांच्या १७ वर्षांखालील वयोगटात ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात प्रथम क्रमांक पटकावले.
या शानदार कामगिरीमुळे रोहन सोनवणे याची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश देसले, सचिव लीना देसले, मुख्याध्यापक सिद्धिकी राहत कौसर, गोपाल सुरडकर, क्रीडा विभाग प्रमुख अरुण भोसले पाटील, क्रीडा शिक्षक संकेत मदने, जावेद पठाण, कनुप बोराळकर, विश्वजित मासरे इत्यादीनी विजयी रोहनचे अभिनंदन केले आणि राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.