 
            सेनगाव ः मानवत येथे होणार्या विभागीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी ए आर टी एम इंग्लिश स्कूल सेनगावच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने घवघवीत यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
या संघात कर्णधार योगेश दळवी, उपकर्णधार कौशल्य व्यास, करण दळवी, सुफी शेख, समर्थ होडबे, अर्णव शिंदे, गणेश सोनटक्के, ओंकार टाले, प्रथमेश बांगर, हर्षवर्धन देशमुख, वैभव जांगीड, आयुष तोष्णीवाल, समर्थ पवार, अब्दुल पठाण या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख संतोष शिंदे, अमोल घुगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या शानदार यशाबद्दल गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, ए आर टी एम इंग्लिश स्कूलचे संचालक पंकज तोष्णीवाल, प्राचार्य प्रवीण कापसे, सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



