 
            सेनगाव ः परभणी येथे होणार्या राज्यस्तरीय रोलर हँडबॉल स्पर्धेसाठी ए आर टी एम इंग्लिश स्कूल सेनगावच्या विश्वजीत राऊत, अनुज पजई, स्वराज शिंदे, श्रीजित कदम, मयूर चव्हाण, ऋग्वेद खनपटे या खेळाडूंची हिंगोली जिल्हा संघात निवड झाली आहे.
या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख संतोष शिंदे, अमोल घुगे व विकास खनपटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल ए आर टी एम इंग्लिश स्कूलचे संचालक पंकज तोष्णीवाल प्राचार्य प्रवीण कापसे, सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



