 
            कन्नड : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत कन्नड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
१४ वर्षाखालील मुलींच्या गटात रूपाली शिंदे हिने ईप्पी प्रकारात सुवर्णपदक पटकावले. शरण्या वाहटोळे हिने ईप्पी प्रकारात रौप्यपदक संपादन केले. अनुष्का जाधव हिने ईप्पी प्रकारात कांस्य पदक जिंकले.
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात फॉइल प्रकारात वेदांत राजापूरे याने सुवर्णपदक जिंकले. अंश सेठी याने रौप्य पदक संपादन केले. अनिश कांबळे याने कांस्य पदकाची कमाई केली.
ईपी प्रकारात सोफियान आत्तार याने रौप्य पदक आणि सोहम जाधव याने कांस्य पदक पटकावले. सेबर प्रकारात स्वराज भोसले याने कांस्य पदक तर अफान देशमुख याने कांस्य पदक जिंकले.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात फॉइल प्रकारात चैतन्य पाटील याने सुवर्णपदक पटकावले. मितांश अग्रवाल याने रौप्य पदक तर भावेश चौधरी याने कांस्य पदक जिंकले. सेबर प्रकारात अथर्व भोसले याने कांस्य पदक जिंकले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ उदय डोंगरे, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ दिनेश वंजारे, क्रीडा मार्गदर्शक तुषार आहेर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्वप्नील तांगडे व सागर मगरे, राष्ट्रीय प्रशिक्षक अजय त्रिभुवन, क्रीडा संयोजक मुकेश गोस्वामी, राष्ट्रीय प्रशिक्षक राहुल दणके, तसेच प्रशिक्षक आरती गायकवाड, मुकेश राठोड आणि चिंतन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सर्वांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स अकॅडमी, कन्नड येथील खेळाडूंच्या या कामगिरीमुळे कन्नड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.



