
नाशिक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नाशिक एज्युकेशन सोसायटीचे पेठे विद्यालय, नाशिक येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
रिले स्पर्धेत विभागीय निवड
४×४०० मीटर रिले (१७ वर्षाखालील मुली)
४×१०० मीटर रिले (१७ वर्षाखालील मुली)
४×१०० मीटर रिले (१४ वर्षाखालील मुली)
वरील सर्व संघांनी उत्तम टीमवर्क आणि वेग दाखवत विभागीय स्तरावर प्रवेश मिळवला आहे.
वैयक्तिक मैदानी स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी
तेजस भुसारे – १५०० मीटर धावणे, तेजल भोये – ६०० मीटर धावणे, गौरी चौधरी – ६०० मीटर धावणे, राहुल थविल – ६०० मीटर धावणे
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक अमोल जोशी यांचे कसून प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना संस्थेचे अध्यक्ष दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्षा नंदा पेटकर, शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी, मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, सुपरवायझर भागवत सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी व संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा कराड, तसेच पालक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, संस्था कार्यकारी मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पेठे विद्यालयाच्या खेळाडूंच्या या कामगिरीमुळे नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा क्षेत्रातील परंपरेत आणखी एक अभिमानाचा अध्याय जोडला गेला आहे.