
नांदेड ः नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत नागार्जुन पब्लिक स्कूचा विद्यार्थी ईशान बारसे याने विविध प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा नावलौकिक वाढवला.
सायन्स कॉलेज नांदेड येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत ईशान बारसे याने १४ वर्ष वयोगटात १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर धावने या तिन्ही प्रकारात जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवत स्पर्धा गाजवली. या कामगिरीमुळे त्याची विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल क्रीडा मार्गदर्शक डॉ अश्विन बोरीकर, प्रलोभ कुलकर्णी, डॉ रमेश नांदेडकर, वैभव दोमकोंडवार, गोविंद पांचाळ, बंटी सोनसळे यांनी ईशानचे कौतुक करत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.