राज्य मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत रायगड संघ विजेता

  • By admin
  • October 16, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

मुंबई ः गोरेगाव, मुंबई येथे आयोजित ६ वी महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. मिक्स बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र संलग्न युथ मिक्स बॉक्सिंग असोसिएशन मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली.

या राज्यस्तरीय स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाचे सचिव राकेश म्हसकर, राज्य अध्यक्ष प्रशांत मोहिते, बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा विभागाचे प्रशासकीय अधिकारी पंकज पिंपळे, विशेष सहकारी अधिकारी  रोहित शेलार, राज्य सचिव नारायण कराळे, सागर शेलार, गणेश पेरे, गोरखनाथ ढवल, संदेश नाईक, राजू मोरे, अंबादत्त पंत आणि आशुतोष पांडे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने स्पर्धेचे उद्घाटन झाले.

या स्पर्धेत सुमारे २५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, ठाणे, पालघर, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वाशिम, भंडारा, अकोला, परभणी, सोलापूर अशा विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी उत्तम स्पर्धात्मक खेळ सादर केला.स्पर्धेचे संचालन विनायक सकपाळ (आंतरराष्ट्रीय मुख्य पंच) आणि अश्विनी चव्हाण (आंतरराष्ट्रीय मुख्य पंच) यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडले.

यावेळी पंच म्हणून योगेश पाटील, रोहन शेवाळे, तृप्ती लाड, संजय सकपाळ, अवधूत घरट, सिद्धी सकपाळ, अनिता पाटील, तन्वी मानकर, योगेश वारगुडे, सचिन प्रजापती, भाग्यश्री मोरे, हितेश भगत, देवाशिष माझी, प्रथमेश म्हामुलकर आणि श्रेयस म्हसकर यांनी उत्कृष्ट कार्य पार पाडले.

स्पर्धेचा निकाल 

प्रथम क्रमांक – रायगड जिल्हा, द्वितीय क्रमांक – नवी मुंबई व ठाणे जिल्हा, तृतीय क्रमांक – मुंबई उपनगर, चतुर्थ क्रमांक – मुंबई शहर.

संपूर्ण स्पर्धा उत्साह, स्पर्धात्मकता आणि क्रीडाभावनेने परिपूर्ण वातावरणात पार पडली. सर्व खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि जिल्हा प्रतिनिधींनी या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेला यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *