टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे यांना विजेतेपद

  • By admin
  • October 16, 2025
  • 0
  • 28 Views
Spread the love

सासवड ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय सासवड येथे प्राचार्य डॉ पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या टेबल टेनिस स्पर्धेत लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे यांना विजेतेपद मिळाले.

त्यांनी प्राध्यापक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात प्रा प्रशांत शिंदे यांचा ११-६, ११-१, ११-८ असा सरळ तीन सेटमध्ये सरळ पराभव केला. तसेच तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात प्रा प्रीतम ओव्हाळ यांनी प्रा संदीप व्यास यांचा ११-९, ११-३, ११-४ असा तीन सेटमध्ये पराभव केला.

तत्पूर्वी, झालेल्या उपांत्य सामन्यात लेफ्टनंट अहिवळे यांनी ओव्हाळ यांचा ११-४, ११-६, ११-४ असा ३-० असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिंदे यांनी व्यास यांना ११-३, ११-९, ११-४ अशा गुण फरकाने पराभूत केले. सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रथमेश जगताप, श्रेयस जगताप व ओंकार कदम यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *