
कोल्हापूर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या कोल्हापूर महानगरपालिका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत एस एम लोहिया ज्युनिअर कॉलेज कोल्हापूरच्या दोन्ही संघांनी उल्लेखनीय कामगिरी करीत विजेतेपद मिळवले.
१९ वर्षाखालील मुलांच्या गटात एस एम लोहिया ज्युनिअर कॉलेजने प्रथम क्रमांक, तर १७ वर्षाखालील मुलांच्या गटात तृतीय क्रमांक पटकावून दुहेरी यश संपादन केले.
अंतिम सामन्याचा रोमांच
१९ वर्ष गटाच्या अंतिम सामन्यात एस एम लोहिया ज्युनिअर कॉलेजचा सामना शाहू कॉलेज, कदमवाडी, कोल्हापूरशी झाला. सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ समान गुणवत्तेने झुंज देत राहिले.
टाय-ब्रेकर नियमानुसार झालेल्या ५ चढाईंच्या फेरीत लोहिया कॉलेजच्या खेळाडूंनी अफलातून प्रदर्शन करीत ५ गुणांच्या फरकाने विजय मिळवला आणि विजेतेपद आपल्या नावे केले.
या विजयानंतर लोहिया ज्युनिअर कॉलेजचा १९ वर्षांचा संघ ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
१९ वर्ष गटातील विजयी संघ
राजवर्धन माने, रिजवान शेख, वैभव इटकर, समर्थ चौगले, उत्कर्ष गंधे, अथर्व लाड, गणेश जोगळे, गौरव भोसले, रितेश पाटील, विपुल हीरेकोडी, श्रवण पाटील, सतीश वळकुंजे.
१७ वर्ष गटातील तृतीय क्रमांक विजेता संघ
आदिराज पाटील, सर्वेश घाडगे, सिद्धेश पाटील, आर्यन शिंदे, आदित्य बाचनकर, साईराज रानगे, संचित मगदूम, प्रांजल पाटील, कुणाल मोरे, आयुष पाटील, विवेक तिप्पे.
प्रशासनाचे अभिनंदन व शुभेच्छा
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे सर्व मान्यवरांनी संघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. गव्हर्निंग कौन्सिलचे सल्लागर विनोदकुमार लोहिया, अध्यक्ष निर्मलकुमार लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर, सचिव प्रभाकर हेरवाडे, संयुक्त सचिव एस एस चव्हाण, तसेच प्राचार्या एस बी पाटील, उपप्राचार्या जी पी नानिवडेकर, बाबासाहेब दुकाने व रमजान शेख, क्रीडा शिक्षक सचिन पुजारी यांच्या मार्गदर्शन, प्रोत्साहन व प्रभावी प्रशिक्षणामुळे संघाने ही शानदार कामगिरी साध्य केली.
या दुहेरी विजयामुळे लोहिया ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूरने शालेय कबड्डी क्षेत्रात आपले वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले असून, विभागीय स्पर्धेतही हा संघ चमकदार यश मिळवेल, अशी सर्वांच्या मनात आशा व्यक्त करण्यात आली आहे.