
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यतेने व कुस्तीगीर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित कुस्ती पंच प्रशिक्षण शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
बळीराम पाटील हायस्कूल समोरील सिडको भागातील हॉटेल केसरी या ठिकाणी सकाळच्या सत्रात कुस्तीगीर असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार प्रदीप जैस्वाल, संघटनेचे सहसचिव ऋषी जैस्वाल यांच्या भ्रमणध्वनी शुभसंदेश व आंतरराष्ट्रीय पंच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी दिनेश गुंड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी माजी महापौर औताडे, बाजार समितीचे सभापती पुनमचंद बमणे, सुनील चौधरी (धुळे) मारुती सातव (पुणे), संतोष भुजबळ (अहिल्यानगर), संभाजी निकाळजे (आंतरराष्ट्रीय पंच), फुलचंद सलामपुरे, शरद कचरे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करून शिबिरचा प्रारंभ करण्यात आला.
संघटनेचे सचिव नितीश काबलिये, अक्षय वाघ, मुक्तार पटेल, रामेश्वर विधाते, अजित शेख, इम्रान पटेल, नवनाथ औताडे, सुमित औताडे, चंद्रकांत काबलिये यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांनी केले. अक्षय वाघ यांनी आभार मानले.
सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये एकूण ९२ कुस्ती पंचांनी सहभाग नोंदविला असून या शिक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या त्यांना ग्रेड, कार्ड व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे संयोजक नितीन काबलिये यांनी कळवले आहे.